esakal | Kolhapur : बहुपयोगी खसखसीची वाढली ‘खसखस’
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Kolhapur : बहुपयोगी खसखसीची वाढली ‘खसखस’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : खसखस नेहमीच महाग असते. कोल्हापूरमध्ये ही खसखस देशातील काही भागांतून तसेच परदेशातून येते. ती महाग होण्याची कारणे अनेक आहेत. मुळातच ती कशी तयार होते, कुठून येते, याची माहिती अनेकांना नसते. यासाठी खसखसीचा उपयोग, निर्बंध, कायदे, पीक आदींचा घेतलेला हा आढावा..

-अमोल सावंत

उगम

खसखसचा उगम हा युरोपम, भूमध्य समुद्री प्रदेश, रशिया, इजिप्त, युगोस्लाव्हिया, पोलंड, जर्मनी, नेदरलॅन्ड, चीन, जपान, अर्जेंटिना, स्पेन, बल्गेरिया, हंगेरी, पोर्तुगालमध्ये आहे. या देशात खसखसचा उपयोग हा औषधी गुणधर्मामध्ये केला जातो; मात्र बर्मा, थायलंड, लाओस, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, पाकिस्तान, इराणमध्ये मसाल्यात वापर केला जातो. खसखस ही समशीतोष्ण, उष्ण कटिबंधीय देशात घेतली जाते. खसखस ही अफूच्या बोंडांमध्ये (ओपियम) मिळते. औषधी गुणधर्म असलेल्या खसखसपासून अफूही बनविली जाते.

भारतात कुठे मिळते?

उपयोग

उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये खसखस घेतली जाते. महाराष्ट्रात खसखसीचा उपयोग हा दिवाळीतील फराळामधील अनारस, मकर संक्रांतीत हलवा करण्यास, काही विशिष्ट पाककृतींत, काही मिळाईमध्ये होतो. तसेच कुस्तीपटू आपल्या आहारात थंडाईचा वापर करतात. या थंडाईत खसखसीला खूप महत्त्व आहे. थंडाईमध्ये खसखस ही वाटून टाकली जाते. बाळंतिणीच्या पौष्टिक आहारात खसखशीची खीर असते. औषधे, खाद्य पदार्थ, बेकरी उत्पादनात वापर केला जातो.

महाराष्ट्रातील स्थिती

महाराष्ट्रात ६५ एकर क्षेत्रात खसखसची शेती होत असल्याची माहिती आहे. खसखस खाण्यावर बंदी नाही; मात्र पिकाचे उत्पादन घेण्यावर कडक निर्बंध आहेत. महाराष्ट्राप्रमाणे अन्य राज्यांमध्येही या पिकांवर निर्बंध आहेत. खसखस मसाल्यात वापरली जाते. महाराष्ट्रात, अन्य राज्यांमध्ये मसाल्यांमध्ये अन्य मार्गाने सेवन करण्याची परवानगी आहे; मात्र उत्पादन घेण्यास बंदी आहे. उत्तम प्रत प्रतिकिलो- २४०० रुपये.काही ठिकाणी- २००० ते २१०० रुपये किंमत आहे.

खसखसचे उत्पादन हे कायद्याच्या कक्षेत घेतले जाते. मोठ्या प्रमाणात सरकारकडून ते खरेदी केली जाते.

उत्तम प्रत प्रतिकिलो- २४०० रुपये.

-काही ठिकाणी- २००० ते २१०० रुपये

हेही वाचा: आश्चर्यच! म्हशीने दिला वासरू सदृष्य रेडकाला जन्म

खसखसीत काय असते?

 1. तत्त्व अंश (१०० ग्रॅम मध्ये)

 2. उष्मांक ५२५ किलो कॅलरी

 3. पिष्टमय पदार्थ २८ ग्रॅम

 4. शर्करा ३ ग्रॅम

 5. तंतुमय पदार्थ २३ ग्रॅम

 6. स्निग्ध पदार्थ ४२ ग्रॅम

 7. प्रथिने १८ ग्रॅम

 8. ‘ब’ २ जीवनसत्त्व (रायबोफ्लेव्हिन) ०.०८२ मिलिग्रॅम

 9. कॅल्शियम १४३८ मिलिग्रॅम

 10. लोह १० मिलिग्रॅम

गुणांनीयुक्त

 1. पचायला हलकी; फायबरचे प्रमाण खूप असल्बयाने बद्धकोष्ठता रोखण्यास मदत होतो.

 2. कॅल्शियम, फॉस्फरसमुळे दात, दाढा, हाडांचे स्वास्थ्य चांगले मेंदूशी जोडले गेलेले न्युरॉन्स अधिक सक्रिय होतात

 3. निद्रानाशाचा विकारावर उपयोग

 4. कोमट दुधात घेतले तर चांगली झोप लागते

 5. तोंड आल्यावर प्रभावी

 6. तोंडाच्या अल्सरपासून सुटका

 7. शरीरात ऊर्जा वाढते, थकवा दूर होतो

 8. रक्तदाब नियंत्रित राहतो

 9. रोगप्रतिकारक क्षमता वाढते

 10. डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित राहते

 11. हृदयविकारापासून संरक्षण

खसखस तुर्कस्तानमधून कोल्हापूर बाजारपेठेत येते. सध्या अफगाणीस्तानमधील परिस्थिती, केंद्र शासनाकडून आयातीवर बंदी आदी घटकांमुळे प्रतिकिलो मागे दर वाढले आहेत.

-राहुल मूग, व्यापारी

loading image
go to top