esakal | आश्चर्यच! म्हशीने दिला वासरू सदृष्य रेडकाला जन्म
sakal

बोलून बातमी शोधा

आश्चर्यच! म्हशीने दिला वासरू सदृष्य रेडकाला जन्म

आश्चर्यच! म्हशीने दिला वासरू सदृष्य रेडकाला जन्म

sakal_logo
By
सुनील कोंडुसकर

चंदगड : तावरेवाडी (ता. चंदगड ) येथील परशराम मारुती कागणकर यांच्या म्हशीने गाईच्या वासरासारखे दिसणाऱ्या रेडकाला जन्म दिला आहे. असा प्रकार दुर्मिळ असल्याने हे रेडकू पाहण्यासाठी परिसरातील लोक कागणकर यांच्या घरी भेट देत आहेत. कागणकर यांनी गोकुळ दूध संघाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून म्हशीचे गाभण लसीकरण करून घेतले होते.

रीतसर गर्भार कालावधी पूर्ण करून म्हैस व्यायली. मात्र काळा-पांढरा रंग आणि गाईच्या वासरा प्रमाणे दिसणारी अंगकांती यामुळे कागणकर यांना आश्चर्य वाटले. यापूर्वी त्यांनी असा प्रकार बघितला नसल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चर्चा केली. ते रेडकूच असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मात्र हा दुर्मिळ प्रकार बघण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत.

हेही वाचा: पुढे ढकललेल्या परीक्षा 'या' दिवशी होण्याची शक्यता; आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

'सुप्त गुणसूत्रांमुळे काही वेळेला अशा प्रकारची रेडके जन्माला येतात. हा दुर्मिळ योगायोग असतो. मात्र त्याचे गुणधर्म बदलत नाहीत.'

- डॉ. शाम लुद्रीक, पशुधन विकास अधिकारी, पॉलिक्लिनिक कोल्हापूर.

loading image
go to top