

Passengers crowd Kolhapur–Mumbai holiday special trains running housefull.
sakal
कोल्हापूर : कोल्हापूर- मुंबई मार्गावर सोडण्यात आलेल्या सुटी विशेष रेल्वे गाड्या येता–जाता हाऊसफुल्ल ठरत आहेत. या मार्गावर प्रवाशांचा कायमच तुडुंब प्रतिसाद असतो. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई मार्गावर नवीन रेल्वे गाड्या वाढविण्यासाठी स्थानिक खासदारांनी तातडीने पाठपुरावा करावा, जेणेकरून येणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये त्यासाठी तरतूद होईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.