

Election officials review the detailed expenditure
sakal
कोल्हापूर : निवडणूक कोणतीही असो, त्यात मतदारांना उत्साह आणण्यासाठी चहा, नाष्टा, जेवणावळी ही ओघाने येते. उमेदवाराला खर्चासाठी मर्यादा नऊ लाख रुपये आहे. या खर्चात २८९ प्रकारचे खर्च दाखवायचे झाल्यास ताळेबंद पाहणाऱ्याला अक्षरशः घाम फुटतो. एक उमेदवार किती लोकांना जेवण देतो आणि किती ताटे खर्चात दाखवतो, या खर्चाची पडताळणी करायची म्हटले तर एक संशोधनाचाच विषय होईल. आयोगाने तांबडा-पांढऱ्याचे दर अगदीच स्वस्त धरले आहेत. त्यामुळे खर्चाची थाळी चांगलीच चर्चेत आली आहे.