Dilshad Mulla OBC caste certificate invalid
esakal
कोल्हापूर : येथील महानगर पालिकेच्या काँग्रेसच्या नगरसेविका दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला यांचा ओबीसी जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरविला आहे. जात पडताळणी समितीने याबाबत कोल्हापूर महापालिकेला पत्र दिले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने मुल्ला यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांना अहवाल पाठविला (Kolhapur corporator Dilshad Mulla latest news) आहे. त्यामुळे मुल्ला यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.