Kolhapur Municipal Corporation : अर्धशतकानंतरही विकास खुंटलेला; संकटांच्या चक्रव्यूहात अडकलेली कोल्हापूर महापालिका
Rising Administrative Costs : मर्यादित उत्पन्न, वाढता प्रशासन खर्च आणि शासन मदतीवरील अवलंबित्वामुळे कोल्हापूर महापालिकेचा विकासाचा वेग मंदावला असून शहराला मोठ्या धोरणात्मक बदलांची नितांत गरज निर्माण झाली आहे.
कोल्हापूर : महापालिका स्थापनेची वर्षे वाढत चाललेली असताना ज्यासाठी स्थापना झाली, त्या शहराचा विस्तार वाढलेला नाही. ना उत्पन्नाचे नवीन स्रोत, ना शासनाकडून अपेक्षित मदत अशा कोंडीत महापालिका आहे.