कोल्हापूर महापालिका निवडणूक: प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण; सर्व 81 प्रभागांचे आरक्षण जाहीर, रणधुमाळीला येणार वेग 

kolhapur municipal corporation Leaving the reservation final result
kolhapur municipal corporation Leaving the reservation final result

कोल्हापूर: महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी अकरापासून सुरू झालेली आरक्षण सोडतीची प्रक्रिया दुपारी दीड वाजता पूर्ण झाली. सर्व 81 प्रभागांचे आरक्षण निश्‍चित झाले असून आता शहरात रणधुमाळाली वेग येणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात ही प्रक्रिया पूर्ण झाली. सोडतीसाठी या परिसरात इच्छुक उमेदवार व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. 


पहिल्या टप्प्यात अनुसुचित जाती प्रवर्गासाठीच्या प्रभागांची सोडत झाली. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) प्रवर्गासाठी एकूण बावीस प्रभागांचे आरक्षण निश्‍चित करून त्यापैकी अकरा प्रभाग पुरूष व अकरा प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. शेवटच्या टप्प्यात एकूण सर्वसाधारण प्रवर्गासाठीच्या 48 प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले. 

0 सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) आरक्षित प्रभाग असे ः प्रभाग क्रमांक 1 (शुगरमिल), प्रभाग क्रमांक 2 (कसबा बावडा पूर्व), प्रभाग क्रमांक 3 (हनुमान तलाव), प्रभाग क्रमांक 5 (लक्ष्मीविलास पॅलेस), प्रभाग क्रमांक 10 (शाहू कॉलेज), प्रभाग क्रमांक 11 (ताराबाई पार्क), प्रभाग क्रमांक 12 (नागाळा पार्क), प्रभाग क्रमांक 14 (व्हीनस कॉर्नर), प्रभाग क्रमांक 28 (सिध्दार्थनगर), प्रभाग क्रमांक 32 (बिंदू चौक), प्रभाग क्रमांक 34 (शिवाजी उद्यमनगर), प्रभाग क्रमांक 39 (राजारामपुरी एक्‍स्टेन्शन), प्रभाग क्रमांक 41 (प्रतिभानगर), प्रभाग क्रमांक 43 (शास्त्रीनगर-जवाहरनगर), प्रभाग क्रमांक 44 (मंगेशकरनगर), प्रभाग क्रमांक 45 (कैलासगडची स्वारी मंदिर), प्रभाग क्रमांक 48 (तटाकडील तालीम), प्रभाग क्रमांक 55 (पद्माराजे उद्यान), प्रभाग क्रमांक 57 (नाथा गोळे तालीम), प्रभाग क्रमांक 58 (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक 60 (जवाहरनगर), प्रभाग क्रमांक 65 (राजेंद्रनगर), प्रभाग क्रमांक 69 (तपोवन), प्रभाग क्रमांक 81 (क्रांतीसिंह नाना पाटीलनगर, जीवबा नाना पार्क), 

0 सर्वसाधारण प्रवर्ग ः प्रभाग क्रमांक 4 (कसबा बावडा पॅव्हेलियन), प्रभाग क्रमांक 6 (पोलिस लाईन), प्रभाग क्रमांक 9 (कदमवाडी), प्रभाग क्रमांक 17 (कदमवाडी), प्रभाग क्रमांक 27 (ट्रेझरी ऑफिस), प्रभाग क्रमांक 29 (कोकणे मठ), प्रभाग क्रमांक 31 (बाजारगेट), प्रभाग क्रमांक 33 (महालक्ष्मी मंदिर), प्रभाग क्रमांक 35 (यादवनगर), प्रभाग क्रमांक 37 (राजारामपुरी तवनाप्पा पाटणे हायस्कूल), प्रभाग क्रमांक 42 (पांजरपोळ), प्रभाग क्रमांक 46 (सिध्दाळा गार्डन), प्रभाग क्रमांक 47 (फिरंगाई), प्रभाग क्रमांक 51 (लक्षतीर्थ), प्रभाग क्रमांक 54 (चंद्रेश्‍वर), प्रभाग क्रमांक 61 (सुभाषनगर), प्रभाग क्रमांक 63 (सम्राटनगर), प्रभाग क्रमांक 66 (स्वातंत्र्यसैनिक वसाहत), प्रभाग क्रमांक 68 (कळंबा फिल्टर हाऊस), प्रभाग क्रमांक 70 (राजलक्ष्मीनगर), प्रभाग क्रमांक 74 (सानेगुरूजी वसाहत), प्रभाग क्रमांक 76 (साळोखेनगर), प्रभाग क्रमांक 77 (शासकीय मध्यवर्ती कार्यालय), प्रभाग क्रमांक 78 (रायगड कॉलनी, जरगनगर) 

0 नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ः प्रभाग क्रमांक 13 (रमणमळा), प्रभाग क्रमांक 15 (कनाननगर), प्रभाग क्रमांक 21 (टेंबलाईवाडी), प्रभाग क्रमांक 24 (साईक्‍स एक्‍स्टेन्शन), प्रभाग क्रमांक 36 (राजारामपुरी), प्रभाग क्रमांक 49 (रंकाळा स्टॅंड), प्रभाग क्रमांक 52 (बलराम कॉलनी), प्रभाग क्रमांक 53 (दुधाळी पॅव्हेलियन), प्रभाग क्रमांक 56 (संभाजीनगर बसस्थानक), प्रभाग 64 (शिवाजी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय), प्रभाग क्रमांक 71 (रंकाळा तलाव). 


0 नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरूष) ः प्रभाग क्रमांक 25 (शाहूपुरी तालीम), प्रभाग क्रमांक 26 (कॉमर्स कॉलेज), प्रभाग क्रमांक 50 (पंचगंगा तालीम), प्रभाग क्रमांक 59 (नेहरूनगर), प्रभाग क्रमांक 72 (फुलेवाडी), प्रभाग क्रमांक 73 (फुलेवाडी रिंगरोड), प्रभाग क्रमांक 80 (कणेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर), प्रभाग क्रमांक 38 (टाकाळा खण- माळी कॉलनी), प्रभाग क्रमांक 23 (रूईकर कॉलनी), प्रभाग क्रमांक 22 (विक्रमनगर), प्रभाग क्रमांक 18 (महाडिक वसाहत), 

अनुसुचित जाती आरक्षित प्रभाग असे
0 अनुसुचित जाती प्रवर्ग (महिला) आरक्षित प्रभाग असे ः प्रभाग क्रमांक 30 (खोलखंडोबा), प्रभाग क्रमांक 67 (रामानंदनगर-जरगनगर), प्रभाग क्रमांक 75 (आपटेनगर-तुळजाभवानी), प्रभाग क्रमांक 40 (दौलतनगर), प्रभाग क्रमांक 16 (शिवाजी पार्क), प्रभाग क्रमांक 19 (मुक्तसैनिक वसाहत). 
0 अनुसुचित जाती प्रवर्ग (पुरूष) आरक्षित प्रभाग असे ः प्रभाग क्रमांक 7 (सर्किट हाऊस), प्रभाग क्रमांक 8 (भोसलेवाडी- कदमवाडी), प्रभाग क्रमांक 20 (राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड), प्रभाग क्रमांक 62 (बुध्द गार्डन), प्रभाग क्रमांक 79 (सुर्वेनगर).  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com