
तटाकडील तालीम परिसर सोन्या मारुती चौकापर्यंतच्या प्रभागात
संध्यामठ, मरगाई गल्ली, महाकालीचा भाग लक्षतीर्थपर्यंतच्या टापूत
गांधी मैदान ते संभाजीनगर बसस्थानकापर्यंतचा एक प्रभाग
मंगळवार पेठेतील काही भाग संभाजीनगरपर्यंत
टाऊन हॉलपासून सुरू झालेल्या प्रभागात दैवज्ञ बोर्डिंगही
राजारामपुरीचेही काही भाग दोन प्रभागांत विखुरले
नागाळा पार्कचा काही भाग कसबा बावड्यासोबत,
काही भाग राजर्षी शाहू-छत्रपती शिवाजी स्टेडियमपर्यंत
Corporator Disappointment Kolhapur : महापालिकेच्या निवडणुकीसाठी बहुचर्चित चार सदस्यीय प्रभाग रचनेचे प्रारूप आज जाहीर करण्यात आले. चार सदस्यांचे १९ प्रभाग, तर पाच सदस्यांचा एक असे २० प्रभाग असून सदस्य संख्या मात्र ८१ कायम ठेवली आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना बुधवार पेठ, राजारामपुरी असे दाट लोकसंख्येचे महत्त्वाचे परिसर फुटले आहेत. त्यामुळे पूर्वीपासून एकछत्री अंमल करणाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दुपारी तीन वाजता महापालिकेने नागरिकांना प्रभाग नकाशे, त्यांचे परिसर व दिशा दर्शविणारी माहिती प्रत्यक्ष, तसेच ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून दिली प्रभागांमध्ये कमीतकमी २५ हजार, तर जास्तीतजास्त ३७ हजार लोकसंख्या आहे.