Kolhapur Municipal : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; कोल्हापूरात १४ भरारी पथके, ११ तपासणी नाके कार्यरत
Code of Conduct : महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत कडक अंमलबजावणीसाठी यंत्रणा उभी केली आहे. सात निवडणूक कार्यालयांसाठी १४ भरारी पथके व स्वतंत्र व्हिडिओ सर्व्हेलन्स पथके नेमण्यात आली आहेत.
कोल्हापूर : निवडणूक कार्यक्रम सुरू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी दोन दिवसांत यंत्रणा उभी केली आहे. उद्यापासून १४ भरारी पथके, ११ ठिकाणी तपासणी नाके सुरू केले जात आहेत.