Voters and party workers await results amid intense former corporator battles in Kolhapur municipal elections.
sakal
कोल्हापूर
Kolhapur Election : आमदार-खासदारांची प्रतिष्ठा पणाला; कोल्हापूर निवडणूक रणधुमाळीच्या उंबरठ्यावर
High-Profile Battles : नऊ प्रभागांत माजी नगरसेवकांची थेट लढत; शहरातील राजकीय गणिते पणाला,आमदार, खासदारांच्या ताकदीची कसोटी; कोणाच्या शब्दाला मतदार प्रतिसाद देणार?
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या दिग्गजांच्या लढतीबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. या लढतीत बाजी कोण मारणार हे आज समजेल. त्यातही ज्या नऊ ठिकाणी १८ माजी नगरसेवकच आमने-सामने आहेत, त्या प्रभागातील निकालाची उत्सुकता तर शिगेला पोहचली आहे.

