

Left party leaders releasing their joint manifesto for the Kolhapur municipal elections.
sakal
कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांनी महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. शहरातील नागरिकांचे आरोग्य व वाहतुकीच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पक्षाचे भावी नगरसेवक व शेतकरी कामगार पक्ष आग्रही पुढाकार घेतील, अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणिस बाबूराव कदम व अतुल दिघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.