Kolhapur Municipal Election Results
esakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणूक निकालाने (Kolhapur Municipal Election Results) दोन वर्षांनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधान परिषद निवडणुकीचे समीकरणही बदलले आहे. बदललेले समीकरण पाहता या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांची ‘वाट’ बिकट असणार आहे.