
Municipal Workers Strike : मागण्यांबाबत प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे महापालिका कर्मचारी संघाने मंगळवारी (ता. २) मध्यरात्रीनंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. संघाने यापूर्वी दोनदा संपाचा इशारा दिला होता; मात्र त्यानंतरही प्रशासनाने आश्वासनांबाबत कार्यवाही केली नसल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे.