
कोल्हापूर : येथील बाबूभाई परीख पुलाखाली महापालिकेकडून सहा एलईडी दिवे बसविल्याने शनिवारी सायंकाळी हा परिसर उजळून निघाला. यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी येथील दिवे अज्ञातांनी फोडल्याने नागरिकांना अंधारातूनच जीव मुठीत घेऊन जावे लागत होते.