Kolhapur : राष्ट्रीय लोक अदालत ११ डिसेंबरला : पंकज देशपांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महालोक अदालत

राष्ट्रीय लोक अदालत ११ डिसेंबरला : पंकज देशपांडे

कोल्हापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने ११ डिसेंबरला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा व्ही. व्ही. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालत होत आहे. औद्योगिक, सहकार, कौटुंबिक, कामगार न्यायालय आणि शाळा न्याधिकरण येथे ऑनलाईन व प्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी पत्रकाद्वारे केले.

जिल्हा व सत्र न्यायालय, तालुका न्यायालय कळे, खेरीवडे, मलकापूर, पन्हाळा, कागल, कुरुंदवाड, इचलकरंजी, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, जयसिंगपूर, पेठवडगाव, राधानगरी येथे आयोजित अदालतीमध्ये तडजोडीस पात्र व प्रलंबित वाद, तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. न्यायालयात प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ एन. आय. ॲक्ट प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे,

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

मोटर वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅंकेशी संबंधित प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलिफोन, मोबाईल कंपनी संबंधित वाद, राज्य वीज वितरण प्रकरणे आदी प्रकरणांचा समावेश असणार आहे. माहितीसाठी न्याय संकुलातील विधी सेवा विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले.

loading image
go to top