देवाळे (ता. पन्हाळा) : नावली गावात घरगुती वादातून गोळीबार (Kolhapur Firing) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेवानिवृत्त सैनिक नीलेश राजाराम मोहिते यांनी आपला मेहूणा विनोद अशोक पाटील यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत विनोद पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने कोडोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.