
Sharad Pawar Ajit Pawar NCP : राज्यस्तरीय नेतृत्वाचे दुर्लक्ष, स्थानिक नेतृत्वाकडून स्वतःपुरताच विचार, कार्यकर्त्यांच्या मोट बांधणीबाबत निरुत्साह, स्वबळापेक्षा कुणाच्या तरी कुबड्या घेऊनच सत्ता मिळवण्याची रणनीती आदी कारणांमुळे ज्या जिल्ह्यात पक्षाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच जिल्ह्यात पंचवीस वर्षांनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसची अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा पुन्हा ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान असेल.