Missing Mobile Phone Adds Mystery to Kolhapur Student Sneha Sonawane's Death
esakal
कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेचे पेपर देणाऱ्या स्नेहा शिवाजी सोनवणे (वय १९, रा. कनाननगर) हिने काल दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Class 12 student case Kolhapur 2026) केली. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे पाऊल उचलण्यामागे परीक्षेचा तणाव की अन्य काही कारण आहे याचा तपास पोलिस करीत आहेत. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.