
-ओंकार धर्माधिकारी ः
कोल्हापूर : शहरातील हवा स्वच्छ असावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत महापालिकेला कोट्यवधीचा निधी मिळाला. त्यातून शहरांतर्गत विविध कामे केली; पण महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बहुतांसी उपाययोजना बंद आहेत. एका अर्थाने स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केलेली ही धूळफेकच म्हणावी लागेल. याची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली असून, याबद्दल महापालिकेला नोटीसही बजावली आहे.