Kolhapur News : सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का; गोकुळ दूध संघाची 'ही' याचिका High Court ने फेटाळली

न्यायालयाच्या या निर्णयाने संघाच्या लेखापरीक्षणाचा मार्ग झाला मोकळा
Kolhapur News Gokul Dudh Sangh
Kolhapur News Gokul Dudh Sanghesakal
Updated on: 
Summary

शासनाने संघाचे चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देऊन त्याची जबाबदारी सोलापूरच्या उपनिबंधकांकडे दिली होती.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (Gokul Milk Union) चाचणी लेखापरीक्षणाला स्थगिती मिळावी, म्हणून संघाने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयानं (High Court) नुकतीच फेटाळून लावली. या निर्णयाने सत्ताधाऱ्यांना धक्का बसला असून संघाच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयानंतर संघाचे लेखापरीक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (गोकुळ) सत्तांतर झाल्यानंतर अनेक प्रकरणांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी केला होता. याच मुद्यावर संघाचे चाचणी लेखापरीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली होती.

Kolhapur News Gokul Dudh Sangh
वाद चिघळला! 'कावेरी'वरून कर्नाटकला मोठा धक्का; तामिळनाडूला रोज पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याची सूचना

त्यानुसार शासनाने संघाचे चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देऊन त्याची जबाबदारी सोलापूरच्या उपनिबंधकांकडे दिली होती. पण लेखापरीक्षणासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना संघाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप झाला. त्यानंतर संघाने या लेखापरीक्षणाला स्थगिती मिळावी म्हणून थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने या कारवाईला खो बसला होता.

Kolhapur News Gokul Dudh Sangh
Kolhapur : गावचं नाव बदलण्याऐवजी चंदगड तालुक्याचंच नाव बदललं; चूक लक्षात येताच प्रशासनानं काय केलं बघाच!

संघाने दाखल केलेल्या या याचिकेवर आज सुनावणी होऊन न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयाने संघाच्या लेखापरीक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून ही कारवाई तातडीने होण्यासाठी आता विरोधकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Kolhapur News Gokul Dudh Sangh
Hasan Mushrif : 'तो शब्द अनावधानानं माझ्या तोंडून गेला'; असा कोणता शब्द होता, ज्यामुळं मुश्रीफांना घ्यावा लागला यूटर्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Gokul Election 2026
Satej Patil Hasan Mushrif Kolhapur Politics gokul dudh election
Why is Gokul milk union election delayed?
Marathi News Esakal
www.esakal.com