Fraud
FraudCrime

नकली पत्रे विक्रीप्रकरणी कणकवलीत एकावर गुन्हा, मंदिरालगतच्या गाळ्यातून लाखांचा माल जप्त

Kolhapur News Kankavli Dummy Iron Sheets selling in kankavli Case has been registered against one

Kankavli News: नकली पत्रे विक्रीला ठेवल्‍याप्रकरणी वागदे येथील एका व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपासी अधिकारी सागर आबनवे यांनी याबाबत येथील पोलिसात तक्रार दिली. त्‍यानुसार रोहित विष्णू शेट्ये (वय ३१, रा. करूळ-फोपेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला.

शहर परिसरात नकली पत्रे विक्री होत असल्‍याची बाब संबंधित कंपनीच्या लक्षात आली होती. याप्रकरणी ईपीआय मुंबई या कंपनीकडे तपासाची जबाबदारी दिली. त्‍यानुसार कंपनीचे तपासी अधिकारी आबनवे यांनी बुधवारी (ता. १) शहरासह वागदे येथील काही दुकानांची तपासणी केली. यामध्ये गणेश मंदिरलगतच्या एका दुकान गाळ्यामध्ये नकली पत्रे विक्रीसाठी ठेवलेले आढळून आले.

आबनवे यांना वागदे येथील रोहित शेट्ये यांच्या दुकान गाळ्यात १ लाख ३६ हजार ६२० रुपये किंमतीचे नकली पत्रे असल्‍याचे आढळून आले. पंचनामा करून त्‍यांनी याबाबत कणकवली पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शेट्ये याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. (Latest Marathi News)

Fraud
Maratha Reservation : जरांगेंचे उपोषण स्थगित; राज्य शासनाला आता दोन महिन्यांचा कालावधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com