
कोल्हापूर : पंचगंगा घाटावर गेली तीन दिवस दुर्गंधीयुक्त काळे पाणी असल्याने रोज पोहायला येणाऱ्यांनी नदीकडे पाठ फिरवली आहे. आज पहाटे झालेल्या पावसानंतर तर सकाळी पंचगंगा घाटावर प्लास्टिक कचऱ्याचा अक्षरशः खच साठून राहिला. दरम्यान, महापालिकेने घाट मार्गावरील काही ठिकाणाचा कचरा सकाळी काढला. मात्र, नदीपात्रातील पाणी तसेच पुढे प्रवाहित होत राहिले.