Pooja Bhosale Arrest
esakal
कोल्हापूर : गरजू, गोरगरिबांना ‘निवारा ट्रस्ट’कडून २५ लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळवून देण्याच्या बहाण्याने (Kolhapur Fraud Case) अनामत रकमेपोटी २२ लाख ३७ हजारांची फसवणूक करून पसार झालेल्या पूजा अजित भोसले ऊर्फ पूजा अनंत जोशी (वय ४१, रा. राजारामपुरी ३ री गल्ली) हिला अटक करण्यात आली. तीन वर्षांपूर्वी तिच्याविरोधात गुन्हा दाखल होताच ती पसार झाली होती. ती सध्या भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेनंतर येरवडा कारागृहात असल्याची माहिती मिळताच तिथून ताबा घेण्यात आला.