कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक रद्द करा; करुणा शर्मांचा मागणी

निवडणूक रद्द व्हावी यासाठी हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टात धाव घेणार
Karuna Sharma
Karuna Sharma

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक (Kolhapur Uttar ByElection) रद्द करण्यात यावी अशी मागणी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केली आहे. आचारसंहितेचं उल्लंघन झाल्यानं ही निवडणूक रद्द करण्यात यावी, जर ती रद्द झाली नाही तर आपण सुप्रीम कोर्टापर्यंत (Supreme Court) जाऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Kolhapur North by election should be canceled Karuna Sharma objection)

Karuna Sharma
Kolhapur By Election Result: सत्यजित कदम पिछाडीवर

करुणा शर्मा म्हणाल्या, "कोल्हापूर उत्तरमध्ये आचारसंहितेचं उल्लंघन झालं असून १० तारखेलाच इथं आचारसंहिता संपली होती. तरीही काँग्रेस आणि भाजपनं आपापल्या मोठ्या वर्तमानपत्रात जाहिरात आणि प्रचाराच्या बातम्या दिल्या आहेत. यामुळं आचारसंहितेचं उल्लंघन झालं आहे. त्याचबरोबर या पक्षांचे लोक इथं पैसे वाटताना पकडले गेले आहेत. याशिवाय इथं काँग्रेस आणि भाजपकडून ४० लाखांहून अधिक खर्चही झाला आहे. यासंदर्भात मी निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही. खरतरं मतमोजणी रद्द करुन ही निवडणूकच रद्द करण्यात यायला हवी होती. पण तरीही मतमोजणी सुरु आहे याचा मी विरोध करतो. याविरोधात आता मी कोर्टात धाव घेणार आहे. ही लोकशाही आहे, कायदा सर्वांसाठी समान आहे"

मी हारुनही जिंकणारी बाजीगर

आचारसंहिता भंगाचे माझ्याकडे पुरावे असून त्यावरुनच मी तक्रार दाखल केली आहे. काल रात्री मी कलेक्टर ऑफिसला याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर मुंबईला गेल्यानंतर हायकोर्टात मी रिट पिटिशन दाखल करणार आहे. या निवडणुकीत माझा आधीच विजय झाला आहे. मला राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी या निवडणुकीची मदत झाली हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला मतं जरी कमी असली तरी मला या निवडणुकीत बरचं काही शिकायला मिळालं आहे. यासाठी मी देवाचे आभार मानते. मी हारुनही जिंकणारी बाजीगर आहे, असंही पुढे करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

पुढची योजना कशी असेल?

शर्मा म्हणाल्या, पुढच्या निवडणुकीसाठी माझ्या शिवशक्ती सेना पक्षाची नोंदणी होईल. यानंतर महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत मी माझ्या पक्षाचे उमेदवार उभे करणार आहे. येत्या काळात बीड ते कोल्हापूरवर माझं लक्ष केंद्रीत असेल कारण मला तिथून मोठं फॅन फॉलोविंग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com