‘स्मार्ट अंगणवाडी’ कागदावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anganwadi.jpg

कोल्हापूर : ‘स्मार्ट अंगणवाडी’ कागदावरच

टोप - सौर ऊर्जेवर चालणारी विद्युत यंत्रणा, ई-लर्निंगची सुविधा, एलईडी टीव्ही, यूएसबी पोर्टल, मुलांसाठी टेबल, खुर्ची, जल शुद्धीकरण यंत्र, इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे अशी अद्यावत उपकरणे आणि सुविधांनी सुसज्ज अशी स्मार्ट अंगणवाडी तयार करण्याची घोषणा राज्य सरकारने चार वर्षांपूर्वी केली. मात्र, त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध झालेला नाही. परिणामी ही केवळ घोषणाच राहिली असून, स्मार्ट अंगणवाडी प्रकल्प कागदावरच राहिल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडी राबवली जाते. या योजनेतून अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा भौतिक, शारीरिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे ध्येय आहे. राज्यात सध्या ९७ हजार अंगणवाड्या असून, यात दोन लाख अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ० ते ६ वयोगटातील ७३ लाख बालकांना सेवा दिली जाते. या मुलांना पोषणयुक्त आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, औपचारिक शालेय शिक्षण केंद्रातून देण्याचा प्रयत्न आहे. यामधील अडथळे दूर करण्याचा प्रयन सुरू आहे. या अंगणवाड्यांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने आदर्श अंगणवाडी अर्थात स्मार्ट अंगणवाडीची घोषणा केली होती. यातून प्रत्येक जिल्यातील अंगणवाड्यांना स्मार्ट सुविधा देण्यात येणार होत्या. त्यासाठी अंगणवाडीच्या नावांचे प्रस्ताव सरकारकडे पाठवले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली आणि किती अंगणवाडी स्मार्ट झाल्या याचा शोध घ्यावा लागेल.

अशी असेल स्मार्ट अंगणवाडी

अंगणवाड्यांमध्ये वॉटर प्युरीफायर, सिलिंग फॅन, धान्य कोठी, कारपेट, ग्रीन बोर्ड, घसरगुंडी, डुलता घोडा, ई-लर्निंग साहित्य, अंगणवाडी अंतर्गत व बाह्य रंगकाम, बोलक्या भिंती, छत दुरुस्ती, भिंतीची दुरुस्ती व डागडुजी, दरवाजा व खिडक्या दुरुस्ती, लायब्ररी रॅक आदी सुविधा देण्यात येतील.

Web Title: Kolhapur Not Enough Funds Available For Smart Anganvadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurFundingAnganwadi
go to top