esakal | कोल्हापूर : अल्प दृष्टीवर मात करत गारगोटीचा 'आनंद' देशात ३२५ वा
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर: अल्प दृष्टीवर मात करत गारगोटीचा 'आनंद' देशात ३२५ वा

कोल्हापूर: अल्प दृष्टीवर मात करत गारगोटीचा 'आनंद' देशात ३२५ वा

sakal_logo
By
धनाजी आरडे

गारगोटी : येथील आनंद अशोक पाटील यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२० मध्ये घेतलेल्या परीक्षेत देशात ३२५ वा क्रमांक पटकाविला. आनंदला तिसऱ्या वर्षी दोन्ही डोळ्यांचा मोतीबिंदू झाला. त्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तीन वर्षांपासूनच त्याला अल्प दृष्टी आहे.

हेही वाचा: पुणे : पाच लाख नागरिकांच्या मोफत लसीकरणाचे ध्येय

त्याचे प्राथमिक शिक्षण येथील नूतन मराठी येथे झाले असून माध्यमिक शिक्षण आंबोली येथील पब्लिक स्कूलमध्ये झाले. येथील मौनी विद्यापीठाच्या 'आयसीआरई'त सिव्हील इंजिनिअरींग डिप्लोमा केला. यानंतर इस्लामपूर येथील आर. आय. टी. विद्यालयात २०१७ मध्ये बी. टेक. डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. २०११८ साली त्याने यूपीएससीची मुख्य परीक्षा पास केली मात्र मुलाखतीमध्ये त्यास यश आले नाही.

पुन्हा त्यास २०२९ मध्येही त्यास यश आले नाही. तरीदेखील अपयशाने खचून न जाता पुन्हा त्याने खडतर परिश्रम घेऊन जानेवारी २०२१ मध्ये घेतलेल्या परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केले. ३ ऑगस्टला त्याची मुलाखत झाली. या परीक्षेचा निकाल लागला असून देशांमध्ये ३२५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

यश मिळाल्याचा आनंद

"यूपीएससी परीक्षेत यश मिळाल्याचा मला खूप आनंद होत आहे. मला अनेक अडथळे व परिस्थितीचा सामना करावा लागला. ग्रामीण भागातील माझ्यासाख्या विद्यार्थ्यांने मिळविलेले यश हे सर्वांना उर्जा देणारे ठरेल"- आनंद पाटील

loading image
go to top