कोल्हापूर : दहा दिवस गायिले जातात दहा संतांचे अभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadi wari 2022

कोल्हापूर : दहा दिवस गायिले जातात दहा संतांचे अभंग

कोल्हापूर : वारीतील दहा दिवस प्रत्येक दिवशी एका संताचे अभंग गात पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची अनोखी परंपरा फुलेवाडी येथील दत्त मंदिरातील विठ्ठलपंथी सांप्रदायिक भजनी मंडळाने जपली आहे. यंदाच्या वारीतही शंभरहून अधिक वारकरी सहभागी झाले असून आज सांगोला येथून पुढे या वारीचे प्रस्थान झाले. यंदा या वारीचे एकवीसावे वर्ष आहे.

फुलेवाडी दत्त मंदिर परिसरातील विठ्ठल भक्त एकत्र आले आणि त्यांनी विठ्ठलपंथी भजन मंडळ स्थापन केले. वर्षभर या मंडळाच्या माध्यमातून विविध ठिकाणी भजनाचे कार्यक्रम सादर होतात; मात्र या मंडळाने सांप्रदायिक भजनाचीच परंपरा नेटाने पुढे सुरू ठेवली आहे. नव्या पिढीला त्यातून संस्कारांबरोबरच समाजभान निर्माण व्हावे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. दहा दिवसांत रोज एका संताचे अभंग वारीच्या वाटेवर गायिले जातात.

एक जुलैला फुलेवाडीतून वारीचे प्रस्थान झाले असून शिरोली, निमशिरगाव, नृसिंहगाव, विठ्ठलवाडी, उदनवाडी मार्गे आज सांगोला येथे वारीचा मुक्काम राहिला. खर्डीमार्गे उद्या (ता. ८) वारी पंढरपुरात पोचेल. फुलेवाडी परिसरातील विठ्ठल भक्तांच्या पुढाकाराने पंढरपूर येथे मठ बांधला असून तेथे वारकऱ्यांचा दोन दिवस मुक्काम राहणार असून तेथे प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष महादेव मेढे, सचिव अरुण पाटील सांगतात, ‘‘एकवीस वर्षांपूर्वी १९९९ ला दत्त मंदिरात आम्ही भजनी मंडळाची स्थापना केली. सांप्रदायिक भजनाचीच परंपरा पुढे न्यायचा आम्ही निर्धार केला आणि आजतागायत तो कायम आहे.

Web Title: Kolhapur Pandharpur Wari Phulewadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top