Heart Attack Case : क्रिकेट खेळताना मैदानावरच बारावीत शिकणाऱ्या युवकाला हृदयविकाराचा झटका; उत्कर्षच्या मृत्यूने हळहळ
Sudden Heart Attack Claims Life of 18-Year-Old Student in Kolhapur : पाटगाव येथील १८ वर्षीय विज्ञान शाखेतील विद्यार्थी उत्कर्ष देसाई याचा खेळताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
गारगोटी : पाटगाव (ता. भुदरगड) येथील उत्कर्ष सुरेश देसाई (वय १८) या उमद्या, कष्टाळू महाविद्यालयीन तरुणाचा खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) दुर्दैवी मृत्यू झाला.