Kolhapur Honey Production News
esakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील पाटगावसह विविध गावांत मध उत्पादनाचा व्यवसाय वाढत असताना शासकीय खरेदी दर आणि खासगी बाजारातील दरात मोठी तफावत असल्याने नव्या हंगामात मध उत्पादकांकडून शासकीय दरवाढीची अपेक्षा व्यक्त होत आहे. मध संचालनालयाकडून उत्पादकांकडून सध्या ५०० रुपये किलोप्रमाणे मधाची खरेदी केली जाते. त्याच मधाला खासगी बाजारपेठेत ८०० ते १ हजार रुपये किलो दर मिळत असल्याने बहुतांश उत्पादक खासगी ग्राहकांकडे मध विक्रीस प्राधान्य देतात.