Kolhapur : शेंडापार्क वनीकरणातील रोपांची वाढ

गाठली १० फूट उंची; गवत कापणी वेळेवर करण्याची शेतकऱ्यांना केली सूचना
Kolhapur
Kolhapur Sakal
Updated on

कंदलगाव : शहर परिसरातील वाढते प्रदूषण पाहून शहरालगतच्या शेंडापार्क परिसरात रिकाम्या ९० एकर जागेत ४० हजार वृक्षरोपांची लागवड करून शहरासह उपनगरातील नागरिकांसाठी सामाजिक वनीकरणाने ऑक्सिजन पार्क तयार केला आहे.

यंदा पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी चांगले असल्याने व गतवर्षी देखभाल व्यवस्था योग्यरितीने झाल्याने वनीकरणातील रोपांनी १० फुटांची उंची गाठली आहे. त्यामुळे परिसर हिरवागार दिसत असून, वनीकरण क्षेत्रात जैवविविधताही वाढल्याचे दिसत आहे. मात्र; अनेकदा परिसरातील गवताची कापणी वेळेत केली नसल्याने आग लागून संपूर्ण परिसरातील वृक्ष लागवडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. गवतामुळे पुन्हा असा प्रसंग घडू नये यासाठी वनीकरण परिसराकडे दुर्लक्ष नको; अशी मागणी वृक्षप्रेमींतून होत आहे.

अनेकांचा हातभार..

वनीकरण क्षेत्राला आग लागून दोन वेळा वृक्षरोपांसह जैवविविधा जळून खाक झाली होती. सामाजिक वनीकरण विभाग, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत, शिक्षक, वृक्षप्रेमी, तरुण मंडळांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून वनीकरण जोमाने उभे केले.

उन्हाळ्यात गवतामुळे होणारा धोका ओळखून गवत वेळेत उचलणे गरजेचे आहे. गवतामुळे पुन्हा जळीताचा धोका आहे.

- अशोक पुंदीकर; अध्यक्ष, समाजवेध दक्षता फाउंडेशन

पुढील धोका ओळखून सर्व शेतकऱ्यांना गवत वेळेत उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. या महिन्यात परिसर स्वच्छ होईल. गवत कापणी पूर्ण होताच आगरोधक पट्टे आखून घेऊ.

- आर. आर. सूर्यवंशी, सहयोगी संचालक, कृषी महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Kolhapur welcome the release of the first beneficiary list under the Maharashtra Farmer Loan Waiver Scheme
Forest Department action in Dhangarwadi Kolhapur
Maharashtra Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme
Prakash Abitkar joins farmers in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com