संशयित कदम याचे शिक्षण एमबीएपर्यंत झाले आहे; परंतु गुन्हेगारी वृत्तीतील संगतीमुळे तो बनावट नोटा खपविण्याकडे वळला. नोटा छापणाऱ्या मुख्य संशयिताकडून बनावट नोटा आणून तो बाजारात विकत होता.
कोल्हापूर : बनावट नोटा चलनात (Fake Currency Notes) आणण्यासाठी त्या एटीएम सेंटरच्या (ATM Center) डिपॉझिट मशीनमध्ये भरण्याचा प्रयत्न उघडकीस आला. नोटा भरणाऱ्या सराफासह तिघांना पोलिसांनी (Kolhapur Police) अटक केली असून, त्यांच्याकडून पाचशे रुपयांचा ८६ बनावट नोटा जप्त केल्या.