Kolhapur Police Bribe Case: कारवाई टाळण्यासाठी कॉन्स्टेबलनं मागितले दीड लाख; लाच घेताना रंगेहाथ पकडले, दोन मध्यस्थही अडकले

ACB Trap Over ₹1 Lakh Bribe: कोल्हापुरातील कुरुंदवाड पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलने तक्रारीवरील कारवाई टाळण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.
Kolhapur Police Bribe Case

Kolhapur Police Bribe Case

esakal

Updated on

कोल्हापूर: पोलिसांत दिलेल्या तक्रारीत मदत करण्याच्या आमिषाने दीड लाखांची मागणी त्यापैकी एक लाखाची लाच स्वीकारताना कुरूंदवाड पोलिस ठाण्याचा अंमलदार दोन पंटरांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. संतोष विश्वास साळुंखे (वय ४३, रा. शिवराज कॉर्नर, कबनूर, ता. हातकणंगले), फिरोज पापालाल बिजापुरे (४०, रा. हेरवाड), जमीर सलीम पठाण (४१, रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ) अशी कारवाई संशयितांची नावे आहेत. तिघा संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com