esakal | कोल्हापुरात वाहन जप्तीचा धडका; सुमारे 4 लाखाची कारवाई

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात वाहन जप्तीचा धडका; सुमारे 4 लाखाची कारवाई
कोल्हापुरात वाहन जप्तीचा धडका; सुमारे 4 लाखाची कारवाई
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर धडक कारवाई जिल्हा पोलिस दलाकडून सुरू आहे. आज दिवसभरात 146 वाहने जप्त करून नियमांचा भंग करणाऱ्यांकडून चार लाखांहून अधिकचा दंड वसूल केला. संचारबंदीच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांंपासून पोलिस यंत्रणा रस्त्यावर बंदोबस्त बजावत आहेत. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी नाकाबंदीसह गस्तीपथकाद्वारे कारवाई सुरू केली.

आज दिवसभरात शहरातील जुना वाशीनाका, दसरा चौक, बिंदू चौक, फोर्ड कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर अशा शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. विना मास्क फिरणाऱ्यांवर महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. नियमांचा भंग करणाऱ्यांकडून तब्बल 4 लाख 19 हजार 400 रूपयांचा दंडही वसूल केला.

हेही वाचा: ज्येष्ठांसाठी आता 1090 हेल्पलाईन; पोलिस दल पुरवणार 24 तास सेवा

कारवाईचा तपशील

  • प्रकार कारवाई दंड वसूल

  • विना मास्क - 411 1,12,000

  • मोटार व्हेईकल ऍक्‍ट - 1,387 3,07,400