esakal | ज्येष्ठांसाठी आता 1090 हेल्पलाईन; पोलिस दल पुरवणार 24 तास सेवा
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठांसाठी आता 1090 हेल्पलाईन; पोलिस दल पुरवणार 24 तास सेवा

ज्येष्ठांसाठी आता 1090 हेल्पलाईन; पोलिस दल पुरवणार 24 तास सेवा

sakal_logo
By
- राजेश मोरे

कोल्हापूर : कोरोना संकट काळात जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणीच्या काळात जिल्हा पोलिस दल मदतीचा हात देत आहे. अशा नागरिकांसाठी पोलिस नियंत्रण कक्षात 1090 ही हेल्पलाईन सुरू केली आहे. चौवीस तास सुरू असणाऱ्या या हेल्पलाईनद्वारे ज्येष्ठांना वैद्यकीय मदतीसह अन्य अडचणीत पोलिस मदत करणार असल्याचे गृह पोलिस उप-अधीक्षक सुनिता नाशिककर यांनी सांगितले.

सध्या कोरोनाचे संकट वाढत आहेत. ज्येष्ठ व्यक्तींच्या अनेक समस्या असतात. अनेकांची मुले परगावी व परदेशात नोकरी व्यवसायामुळे दूर राहतात. उतारवयात एकट राहताना त्यांना अनेक अडचणींचा समाना करावा लागतो. त्यात कोरोनाच्या संकटामुळे त्यांना औषध खरेदीसह वैद्यकीय उपचार, कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापासून पेन्शनपर्यंच्या कामांसाठी घराबाहेर पडता येत नाही. ज्येष्ठांसाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुढाकार घेत हेल्पलाईन सेवा सुरू केली.

हेही वाचा: 'गोकुळ'चे कोरोना बाधित ठरावदार पीपीई किट घालून करणार मतदान

पोलिस नियंत्रण कक्षात 1090 ही हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यासाठी दोन स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ज्येष्ठांनी अडचण आल्यास त्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. हेल्पलाईनवर ज्येष्ठांनी संपर्क साधल्यानंतर नियंत्रण कक्षातून संबधित पोलिस ठाण्यातील अमंलदाराशी आलेल्या हद्दीतील ज्येष्ठ व्यक्ती रहात असलेला पत्ता जाणून घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्वोतोपरी मदत ज्येष्ठांना दिली जात आहे. आतापर्यंत या हेल्पलाईवर 13 ज्येष्ठांनी संपर्क साधला. त्यांना कोरोना प्रतिबंधक लस, औषधे व वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे. मदतीसाठी सैदव तस्पर असणाऱ्या या हेल्पलाईनबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

"ज्येष्ठांनी कोरोना संकटात घराबाहेर न पडता येणाऱ्या अडचणीबाबत 1090 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. जिल्हा पोलिस दल त्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे."

- सुनिता नाशिककर, (गृह पोलिस उप-अधीक्षक)

loading image