Rohit Pawar : महाराष्ट्रातली शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा भाजपनं संपवली; रोहित पवारांचा आरोप

'तरुणांना उद्योग देण्याऐवजी उद्योजकांना नाहक त्रास देण्याचं धोरण सुरू'
Rohit Pawar VS Devendra Fadnavis
Rohit Pawar VS Devendra Fadnavisesakal
Summary

भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरातच नव्हे, तर राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा संपवण्याचे काम केले असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

कोल्हापूर : जिल्ह्यात मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते व नातेवाईकांकडून उद्योजकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळेच जिल्ह्यातील उद्योग इतर ठिकाणी स्थलांतर करणार असल्याचे सांगत आहेत. तरुणांना उद्योग देण्याऐवजी उद्योजकांना नाहक त्रास देण्याचे धोरण सुरू असेल, तर उद्योग वाढणार कसा? अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.

येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज (ता. २५) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोल्हापूर शहर कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमदार पवार म्हणाले, ‘सरकारकडे तरुणांना रोजगार द्यावा, याचे कोणतेही धोरण नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राची काढलेली श्वेतपत्रिका ही केवळ कोरी पत्रिका आहे.

Rohit Pawar VS Devendra Fadnavis
Sharad Pawar : कोल्‍हापुरात धडाडणार शरद पवारांची तोफ; निशाण्यावर कोण अजितदादा की मुश्रीफ? उत्‍सुकता शिगेला

उद्योगाबाबतही तरुणांची दिशाभूल सुरू आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, महिला आघाडीच्या नेत्या विद्या चव्हाण, रोहित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी, अनिल घाटगे, अमर पाटील, सुनील देसाई, निरंजन कदम, पद्मा तिवले, अश्विनी माने, रमेश पोवार, नितीन पाटील आदी उपस्थित होते.

Rohit Pawar VS Devendra Fadnavis
Hasan Mushrif : '1998 मध्ये हसन मुश्रीफांना अनेकांचा विरोध होता, तरीही उमेदवारी दिली'; रोहित पवारांवर पलटवार

‘शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा भाजपने संपवली’

भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरातच नव्हे, तर राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा संपवण्याचे काम केले असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उद्या दसरा चौक येथे सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपला लक्ष्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com