गारगोटी : ‘‘माजी आमदार के. पी. पाटील (K. P. Patil) यांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश नसून स्वागत आहे. त्यांच्या हृदयात सदैव ‘राष्ट्रवादी’ आहे. आगामी काळात के. पी. पाटील यांची पाठराखण केली जाईल. त्यांच्यामुळे पक्षाला बळ मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याचा नक्की फायदा होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.