कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाचा राजीनामा अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी दिला आहे. तो मंजूर करण्यासाठी आज (ता. २२) संचालकांची बैठक बोलविली आहे. गोकुळ शिरगाव येथील संघाच्या मुख्य कार्यालयात दुपारी एक वाजता बैठक होईल. तेथे या राजीनाम्यावर मंजुरीचे शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे नव्या अध्यक्षांच्या (Gokul President Election) नावाकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.