Kolhapur : निवडणुकीपूर्वीच उडणार धुरळा! 'या' मतदारसंघात माने, शेट्टींसह खोतांचीही 'एन्ट्री'; दिग्गज नेत्यांत 'काँटे की टक्कर'

शेतकरी, मतदारांच्या प्रश्‍‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेट्टी मैदानात उतरले आहेत.
Kolhapur Politics Hatkanangale Loksabha Election
Kolhapur Politics Hatkanangale Loksabha Electionesakal
Summary

२०१९ मधील निवडणुकीसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी जोरदार तयारी केली होती.

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangale Loksabha Constituency) शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यात काँटे की टक्कर होईल, अशी चर्चा सुरू असतानाच भाजपचाच किंवा राज्य सरकारचा घटक पक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही यामध्ये उडी घेतली आहे.

Kolhapur Politics Hatkanangale Loksabha Election
Disqualified MLA : ..म्हणून विधानसभा अध्यक्ष 'सर्वोच्च' सुनावणीला विलंब लावून चालढकल करताहेत; NCP आमदाराचा गंभीर आरोप

त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Loksabha Election) लोकसभेचा हातकणंगले मतदारसंघ आरोप-प्रत्यारोपाने गाजणार आहे. २०१९ मधील निवडणुकीसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी जोरदार तयारी केली होती. दीड ते दोन वर्षं मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यानंतर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली होती.

माने विजयी होण्यामागे भाजपची शक्ती आणि खोत यांच्या प्रचार सभांचाही समावेश होता. दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या गेल्या गळीत हंगामातील प्रतिटन ४०० रुपये दराच्या मागणीसाठी काढलेल्या धडक मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ऊस टंचाईमुळे यंदाच्या गळीत हंगामात किती दर असावा याबद्दल जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेतली जाणार आहे.

Kolhapur Politics Hatkanangale Loksabha Election
गद्दारी केलेल्या एकनाथ शिंदेंनी वरळी किंवा ठाण्यातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी; आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज

शेतकरी, मतदारांच्या प्रश्‍‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेट्टी मैदानात उतरले आहेत. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही जिल्ह्यात विविध दौरे सुरू केले आहेत. उसाला जादा दर मिळावा, साखर कारखान्यांची झोनबंदी उठवावी, मराठा ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे, हे चर्चेचे आणि महत्त्वाचे मुद्दे घेवून खोत आणि शेट्टी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आहेत. माने संसदेत याच सर्व प्रश्‍नांवर केंद्र सरकारने गांभभीर्याने विचार करावा, अशी मागणी करत आहेत.

राजू शेट्टींविरोधात उभारणार कोण?

खासदार माने आणि सदाभाऊ खोत हे सत्तेतील घटक पक्षात आहेत. खोत स्वतंत्र असले तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच त्यांचे काम सुरू आहे. राजू शेट्टींविरूद्ध माने की खोत हे भविष्यात ठरेल. त्याआधी मात्र दोन्ही नेत्यांनी आपआपल्या पातळीवर लोकसभेची तयारी सुरू केली आहे.

Kolhapur Politics Hatkanangale Loksabha Election
Devgad Crime : ऐन गणेशोत्सवात कोकण हादरलं! खून झालेल्या प्रसादच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, मिठबांवात खळबळ

प्रमुख इच्छुक उमेदवार

धैर्यशील माने

सकारात्मक बाजू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते

संसदेत विविध प्रश्‍न उपस्थित

माजी खासदार निवेदिता माने यांचे पाठबळ

नकारात्मक बाजू

ठाकरे गटातून फुटल्याने कार्यकर्ते नाराज

सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोचता आले नाही

मतदारसंघातील विकासाबाबत प्रश्‍नचिन्ह

Kolhapur Politics Hatkanangale Loksabha Election
गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेवरून ठाकरे-शिंदे गटातील वाद उफाळला; कार्यकर्त्यांचा रस्त्यावरच ठिय्या, उत्सवाला चढला राजकीय रंग!

राजू शेट्टी

सकारात्मक बाजू

सध्या तरी अपक्ष

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लढा देणारे नेते

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत चांगले संघटन

नकारात्मक बाजू

सर्व पक्षांसोबत संधान बांधण्याचा प्रयत्न

तीव्र आंदोलनाचे हत्यार शिथिल

ज्यांना विरोध केला, त्यांच्यासोबतच संधान

सदाभाऊ खोत

सकारात्मक बाजू

सध्या स्वतंत्र; पण भाजपचे पाठबळ

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लढा देणारे नेते

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांत चांगले संघटन

नकारात्मक बाजू

सत्तेत असताना साखर कारखान्यांचे हवाई अंतर कमी केले नाही

कडकनाथ प्रकरणात बॅकफूटवर

काही ठिकाणी सोयीची भूमिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com