गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेवरून ठाकरे-शिंदे गटातील वाद उफाळला; कार्यकर्त्यांचा रस्त्यावरच ठिय्या, उत्सवाला चढला राजकीय रंग!

कोणी पोळी भाजून घेत असेल तर त्याला गणराया अद्दल घडवेल - संजय पवार
Kolhapur Ganeshotsav Uddhav Thackeray Eknath Shinde Group
Kolhapur Ganeshotsav Uddhav Thackeray Eknath Shinde Groupesakal
Summary

मूर्तीसमोर मी त्याचे नाव घेतले तर अपशकून होईल. कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर आम्ही त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही - राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : संयुक्त शिवाजी चौक मित्रमंडळातील (Sanyukt Shivaji Chowk Mitra Mandal) गणेशमूर्तीच्या (Kolhapur Ganeshotsav) प्रतिष्ठापनेवरून ठाकरे व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांतील वाद उफाळून आला. बिंदू चौकातून गणेश मूर्ती वाजत-गाजत प्रतिष्ठापनेसाठी शिवाजी रोडमार्गे नेताना पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखले.

रस्त्यावरच कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून कोल्हापुरात कोणाची दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. याचवेळी चौकातील मंडपात मूर्तीची प्रतिष्ठापना करू दिली जाणार नाही, असा पवित्रा शिंदे गटाच्या (Shinde Group) कार्यकर्त्यांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला.

Kolhapur Ganeshotsav Uddhav Thackeray Eknath Shinde Group
आरक्षण मिळो ना मिळो! विधानसभेच्या रिंगणात दिसणार 'या' चार महिला; चुरशीच्या लढतीची शक्यता, कोण बाजी मारणार?

दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना शिवाजी रोड वाहतुकीसाठी सुमारे साडेतीन तास बंद करण्यात आला. दरम्यान, दोन मंडप सोडून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास हरकत नसल्याची भूमिका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी घेतली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छोट्या मंडपात शिवाजी चौक रिक्षा मित्रमंडळाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.

Kolhapur Ganeshotsav Uddhav Thackeray Eknath Shinde Group
Disqualified MLA : ..म्हणून विधानसभा अध्यक्ष 'सर्वोच्च' सुनावणीला विलंब लावून चालढकल करताहेत; NCP आमदाराचा गंभीर आरोप

संयुक्त शिवाजी चौक मंडळात दोन गट पडले असून, दोन्ही गटांनी मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी परवानगी मागितली होती. ती प्रशासनाने नाकारली असताना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री अचानक मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने या विषयाला राजकीय रंग चढला.

त्याच मंडपात छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या हेतूने ठाकरे गटाचे संजय पवार, रविकिरण इंगवले, विजय देवणे, कमलाकर जगदाळे, राजू जाधव, प्रीती क्षीरसागर, आबा जगदाळे, शशि बिडकर, चंद्रकांत जगदाळे, विक्रम पाटील, सचिन कारंडे बिंदू चौकात आले. ढोल-ताशांच्या ठेक्यावर सजविलेल्या पालखीतून मूर्ती घेऊन कार्यकर्ते शिवाजी रोडच्या दिशेने चालू लागले.

Kolhapur Ganeshotsav Uddhav Thackeray Eknath Shinde Group
Konkan Ganeshotsav : महाराष्ट्रात असं एक गाव आहे, तिथं कुणाच्याही घरी गणपती प्रतिष्ठापना होत नाही; काय आहे कारण?

पोलिसांनी त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाच्या अलीकडेच अडवले. विजय देवणे यांनी ‘आम्हाला का अडवताय,’ अशी विचारणा करत संताप व्यक्त केला, तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. याचवेळी चौकातील मंडपात क्षीरसागर यांच्यासह शिवसैनिक एकत्र आले. त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मूर्तीची मंडपात प्रतिष्ठापना करू दिली जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

पोलिस प्रशासनासमवेत मंडपातच क्षीरसागर यांच्यासह ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांची बैठक झाली. दोन मंडप सोडून ठाकरे गटाने मूर्तीची प्रतिष्ठापना हरकत नसल्याचा पवित्रा क्षीरसागर यांनी घेतला. सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, कपिल केसरकर, रणजित जाधव, सुनील जाधव, ऋतुराज क्षीरसागर उपस्थित होते.

Kolhapur Ganeshotsav Uddhav Thackeray Eknath Shinde Group
गद्दारी केलेल्या एकनाथ शिंदेंनी वरळी किंवा ठाण्यातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी; आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज

विघ्न आणणारी मंडळी कोण, याचा तपास प्रशासनाने करावा. प्रशासनाच्या बैठकीत दोन्ही गटांनी मूर्तीची प्रतिष्ठापना करायची नाही, असे ठरले होते, तरीही रात्रीत मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आम्हाला घाणेरडे राजकारण करायचे नाही. मंडळात फूट पाडणे, दुर्दैवी आहे. त्याला जशास तसे उत्तर द्यावे लागले. आम्ही कोणावर दादागिरी, अन्याय केला नाही आणि कोणाची सहन करणार नाही. गलिच्छ राजकारणाचा आम्ही निषेध करतो. उत्सवाला गालबोट लागू नये, ही इच्छा असून, कोणी पोळी भाजून घेत असेल तर त्याला गणराया अद्दल घडवेल. कोणत्या नारदमुनीने आग लावली आहे, हे सर्वांना माहीत आहे.

-संजय पवार, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट

Kolhapur Ganeshotsav Uddhav Thackeray Eknath Shinde Group
Devgad Crime : ऐन गणेशोत्सवात कोकण हादरलं! खून झालेल्या प्रसादच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, मिठबांवात खळबळ

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी नसताना गणपती उचलला आणि पालखीत ठेवला. त्यांना राजकारण करायचे आहे. तेवीस वर्षांपूर्वीच्या पीटीआर उताऱ्यावर कपिल केसरकरचे नाव असताना मंडळात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे. गणेशाची विटंबना होऊ नये, यासाठी एक पाऊल मागे घेत आहोत. सातत्याने एखाद-दुसरी व्यक्ती जनतेला वेठीस धरत आहे. हद्दपारीच्या नोटिसा त्याला बजावल्या आहेत. प्रशासनाला खेळविणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी. मूर्तीसमोर मी त्याचे नाव घेतले तर अपशकून होईल. कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर आम्ही त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही.

- राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

संयुक्त छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळ असे मंडळाचे नाव असताना राजेश क्षीरसागर सार्वजनिक गणेश मंडळाच्या नावाने अर्ज का केला? छत्रपतींचे नाव बाजूला का ठेवले गेले? क्षीरसागर यांनी बिंदू चौकात येऊन छातीठोकपणे सांगावे की, राजकारण कोण करत आहे. ते स्वत:ला छत्रपतींपेक्षा मोठे समजतात का? त्यांनी एकदा धर्मवीर पदवी लावून पाहिली. त्यावेळी जनतेने त्यांचा पराभव केला. ते पोलिस प्रशासनाची फसवणूक करत आहेत.

-रविकिरण इंगवले, शहरप्रमुख, ठाकरे गट

शिवाजी चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे गेले अनेक वर्षे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती. स्थानिक रहिवाशांनासोबत घेऊन प्रतिष्ठापना करणे सुरू झाले. राजू नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. दोन वर्षांपूर्वी मंडळात दोन गट पडले. नागवेकर यांना बाजूला करून अन्य कार्यकर्ते एकत्र आले. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नव्या कार्यकारिणीची नोंदणी केली असून, स्वप्नील गवळी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

-चंद्रकांत भोसले, कार्यकर्ते, शिवाजी चौक रिक्षा मित्र मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com