आजरा : शिंपीच्या भूमिकेने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता

चराटी-शिंपी युतीवर मोहर; आजऱ्यातील राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत
NCP
NCPesakal

आजरा : जिल्हा परिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांच्याशी युती करून जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता असून तालुक्यातील राजकीय समीकरण बदलाचे स्पष्ट संकेत आहेत. शिंपींच्या निर्णयामुळे जिल्हा बॅंक निवडणुकीत अशोक चराटी यांना बळ मिळाले आहेच; पण आगामी विविध निवडणुका गट एकत्र लढणार असल्यामुळे राष्ट्रवादीसमोर धोक्याची घंटा आहे.

तालुक्यामध्ये विविध निवडणुकामध्ये राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे. तालुक्याचे विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत तीन तुकडे पडले. यापैकी उत्तूर व कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघ कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघात गेला. याचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादीकडे, तर आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ राधागरी मतदारसंघाला जोडला आहे. याचे प्रतिनिधित्व शिवसेनेकडे आहे. पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे.

NCP
कोल्हापूर : विमानतळ विस्तारिकरणाला येणार गती

हे चित्र एकीकडे आश्‍वासक असताना दुसरीकडे राष्ट्रवादीमधील अंतर्गत सुप्त संघर्ष सुरू होता. सत्तेवरून पक्षातील राजकीय गटात वाद सुरू होते. शिंपी यांनी थेट चराटी यांच्याशी संधान साधल्याने संघर्ष उघड झाला आहे. आजरा सूतगिरणीत जिल्हा बॅंकेसाठी झालेल्या ठराव धारकांच्या मेळाव्यात चराटी-शिंपी गटाच्या युतीमुळे राष्ट्रवादीमधील फुट अटळ बनली आहे. जिल्हा बॅंकेबरोबर विविध निवडणुकामध्ये याचे पडसाद उमटणार आहेत.

पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असलेले शिंपी मधल्याकाळात दूर गेले होते. २०१४ च्या विधानसभेला शिंपी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतले. दरम्यान, त्यांनी जिल्हा बॅंक, आजरा कारखाना, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. सध्या ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. गोकुळ, जिल्हा परिषद अध्यक्षपद व सभापतिपदावरून राष्ट्रवादीमधील पदाधिकारी व त्यांच्यामध्ये राजकीय मतभेद तयार झाले. शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना होती. त्यामुळे त्यांनी चराटी यांच्याशी युती केल्याचे स्पष्ट आहे. चराटी, शिंपी यांचे मनोमिलन झाले तरी कार्यकर्त्यामध्ये मनोमिलन घडणार का हा प्रश्‍न आहे.

NCP
नांदेड : सावकाराच्या तगाद्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

१६ वर्षांनंतर मनोमिलन

२००५-०६ मधील जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्ये चराटी व शिंपी गट एकत्र आले होते. तत्कालीन जिल्हा बॅंक संचालक (कै) राजारामबापू देसाई यांची जिल्हा बॅंकेवरील २५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. (कै) काशिनाथ चराटी बॅंकेचे संचालक झाले. परत एकदा चराटी व देसाई यांच्या वारसात लढाईची शक्यता असून यामध्ये शिंपी यांनी चराटीशी युती करून बळ दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com