
कोल्हापूर : तुम्ही सोन्याचा खंजीर घेऊन जन्माला आला
कोल्हापूर : मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोय म्हणणारे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे राजकारणात सोन्याचा खंजीर घेऊन जन्माला आले आहेत, त्यांना ज्यांनी-ज्यांनी मदत केली, राजकारणात आणले त्यांच्याच पाठीत त्यांनी हा खंजीर खुपसला, अशा शब्दांत आज भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली.
कागल येथील एका कार्यक्रमात श्री. मुश्रीफ यांनी श्री. घाटगे यांच्यावर टीका करताना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला तुम्ही भेटणार कुठे?, त्यांना प्रश्न सांगणार कसे ? असे प्रश्न उपस्थित केले होते, त्याला श्री. घाटगे यांनी व्हीडीओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. स्वर्गीय माजी आमदार शामराव भिवाजी पाटील यांनी तुम्हाला सहकारात आणले, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना बँकेतून बाहेर काढले. राजे विक्रमसिंह घाटगे यांचे बोट धरून तुम्ही राजकारणात आला, त्यांनी तुम्हाला शाहू कारखान्याचे संचालक केले, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून तुम्ही दुसऱ्या बाजूला गेला, स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी स्वतःच्या रक्ताच्या वशंजाला बाजूला ठेवून अल्पसंख्याक व्यक्तीला आमदार, मंत्री केले, अशा मंडलिकांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसले, त्यांना किती वेदना दिल्या, त्यांच्यावर किती टीका केली, हे मी बोलूही शकत नाही. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या जुन्या मतदारसंघातील काही भाग कागलला जोडल्यानंतर मी आहे, समजून श्री. मुश्रीफ यांना मतदान करण्याचे आवाहन केले, पण त्या कुपेकर यांच्याही पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. कै.कुपेकर यांच्या निधनानंतर श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांना त्या भाजपमध्ये गेल्या तर त्यांना आमदारकी राहाणार नाही, असे वक्तव्य तुम्ही केले होते. ज्या घराण्यामुळे तुम्हाला मतदान मिळाले, त्यांना एवढी मग्रुरी कोठून आली.
Web Title: Kolhapur Politics Samarjit Singh Ghatge Mushrif
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..