esakal | कोल्हापूर : ऐन सणासुदीत खासगी बस प्रवास महागणार
sakal

बोलून बातमी शोधा

private travels business

ऐन सणासुदीत खासगी बस प्रवास महागणार

sakal_logo
By
शिवाजी यादव -सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : परिवहन विभागाकडे जुन्या वाहनांच्या नोंदणी व नूतनीकरण फिटनेससाठी रस्ते महामार्ग मंत्रालयाने आठपट शुल्कवाढीचा अध्यादेश लागू केला. त्यामुळे राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आराम बसचालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. या वाढीव शुल्काचा फटका सर्वसामान्य प्रवाशांनाही बसेल. सणासुदीच्या काळात प्रवास महागण्याची टांगती तलवार आहे.

हेही वाचा: अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन;पाहा व्हिडिओ

खासगी बसचे वर्षाला नूतनीकरण करावे लागते. गाडीचा फिटनेस परवाना परिवहन विभागाकडून तपासून घ्यावा लागतो. त्यासाठी एक हजार ५०० रुपये शुल्क होते. यात वाढ करून हे शुल्क १२ हजार ५०० रुपये केले आहे. जिल्ह्यात जवळपास दोन हजारांवर आराम बस आहेत. यात शालेय बसचाही समावेश आहे. प्रत्येक गाडीचा फिटनेस तपासून त्या गाड्या तंदुरुस्त असल्यास वापरता येतात. त्यासाठी परिवहन विभागाचे अधिकारी या गाड्यांची तपासणी करून त्यांना नूतनीकरण केल्याचा दाखला देतात. त्यासाठी एक-दोन दिवस गाडी परिवहन कार्यालयाकडे पाठवावी लागते. परिवहन विभागातर्फे थेट सेवा देण्यात येत असली, तरी बहुतांश आराम गाडी मालक-चालक एजंटांची मदत घेऊन कागदपत्रांची पूर्तता करतात. त्यात एजंटालाही पैसे द्यावे लागतात. दोन वर्षांत कोरोनामुळे बहुतांश आराम गाड्या बंद होत्या. गाड्या मालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. नव्या आदेशामुळे वाढीव शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे एकूण खर्चात वाढ होईल.

दृष्टिक्षेपात

  • एका आराम बसची किंमत- ५० लाख

  • गाडीचा कर्जाचा हप्ता- १ लाख २५ हजार

  • इंधन खर्च महिन्याला- ३ लाख

  • चालक सहायकाचा पगार- ५० हजार

  • प्रवासी कर- ३० ते ४० हजार

  • गाडी दुरुस्ती खर्च- १ लाख

  • फिटनेस नूतनीकरण खर्च- १२ हजार ५०० रुपये

"अपेक्षित उत्पन्न नसताना जेमतेम महसूल मिळतो. आठपट शुल्क वाढल्याने आराम बसमालकांवर संकट ओढवले आहे. प्रवासी भाडेवाढ करावी लागेल. शुल्कवाढीला आम्ही संघटितपणे विरोध करणार आहेत."

- सतीशचंद्र कांबळे, अध्यक्ष, खासगी आराम बसमालक संघटना

loading image
go to top