कोल्हापूर : मासिक सभेत निर्णय; जनजागृतीही करणार

माणगावात विधवा प्रथा बंदी
Kolhapur public awareness decision to ban Widowhood
Kolhapur public awareness decision to ban Widowhoodsakal

रुकडी : माणगाव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीनेसुद्धा हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीप्रमाणेच विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकत्याच झालेल्या मासिक सभेत घेतला. यासंदर्भात गावात जनजागृती करण्याचा तसेच विधवा महिलांना सन्मान देण्याचा ठरावही झाला. सौ. संध्याराणी जाधव सूचक, तर सौ. सुनीता मगदूम अनुमोदक होत्या.

समाजमध्ये विधवांना योग्य सन्मान न दिल्याने त्याचा त्यांच्या मानसिकतावर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेतला. या विधायक कार्याचा वारसा इतर ग्रामपंचायतीने घेणे गरजेचे असल्याचे सरपंच राजू मगदूम यांनी सांगितले. या मासिक सभेत श्री. मगदूम यांच्यासह उपसरपंच अख्तर भालदार, ग्रामविकास अधिकारी बी. बी. राठोडसह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

समाजामध्ये विधवांच्या कपाळावरील कुंकू पुसणे, पायातील जोडव्या काढणे, हातातील बांगड्या फोडणे, गळ्यातील मंगळसूत्र काढणे अशी अमानवी कृत्य करण्यात येतात. शिवाय विधवांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले जात नाही. यामुळे अशा महिलांच्या नैसर्गिक हक्कावर गदा येते. तो कायद्याचा भंगही आहे. गावासह देशात विधवांना सन्मानाने जगता यावे, यासाठी ही प्रथा बंद कण्याचा निर्णय ठराव सभेमध्ये बहुमताने संमत करण्यात आल्याचे सरपंचांनी सांगितले. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्या सौ. संध्याराणी जाधव यांनी या ठरावाची अंमलबजावणी आपल्या घरापासून केली आहे. दरम्यान, गावातील मुलीच्या विवाह समारंभात ग्रामपंचायतीतर्फे आशीर्वाद म्हणून माहेरची साडी (अडीच हजार रुपयांची पैठणी) भेट देण्याचा निर्णयही झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com