पोर्ले, कोल्हापूर : पहिलीपासून दोघे एकत्र शिकायला... एकाच बाकड्यावर बसायचे.... बारावीची परीक्षाही (12th Exam) एकाचवेळी उत्तीर्ण झाले;... पण दोघांचा जीवही एकाच मुलीवर जडला आणि एकतर्फी प्रेमातून व मुलगी भाव देत नसल्याच्या रागातून जीवलग मित्राला शंभर फुटांवरून ढकलून संपवले. मंगळवारी (ता. ३) केर्ले येथील मोहिते खाणीत जखमी अवस्थेत सापडलेल्या महेंद्र प्रशांत कुंभार (वय १८, रा. केर्ले, ता. करवीर) याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मात्र, प्रेमाच्या त्रिकोणातून जीवलग मित्रानेच त्याचा खून शुक्रवार (ता. ६) उघडकीस आले.