2628 Cusecs Water Discharge From Radhanagari Dam
esakal
कोल्हापूर : जिल्ह्याच्या घाट माथ्यावर रविवारी (ता.२०) रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राधानगरी धरणाचा क्रमांक तीनचा स्वयंचलित दरवाजा आज दुपारी २ वाजून २६ मिनिटांनी (Radhanagari Dam automatic gate open) उघडला. पहाटेच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह कसबा बावडा, नागाळा पार्क, उचगाव परिसरातही दमदार पावसाची बरसात झाली. पावसामुळे राधानगरी परिसरातील पिकांना दिलासा मिळाला.