Kolhapur Rain : 'पंचगंगा' इशारा पातळी गाठणार! राधानगरीत 5.95 TMC तर 'या' 14 धरणांत किती आहे साठा? जाणून घ्या..

कसबा बावडा येथे पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणी पातळी ३५ फूट ७ इंचावर गेली आहे.
Kalammawadi Dam Radhanagari Dam
Kalammawadi Dam Radhanagari Damesakal
Updated on: 
Summary

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या धुवॉंधार पावसाने दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात काल सायंकाळपासून पावसाचा (Kolhapur Rain Update) जोर कमी झाला आहे. मात्र, राधानगरी धरणातून (Radhanagari Dam) १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तासातासाला इंचाइंचाने पाणी वाढत आहे.

Kalammawadi Dam Radhanagari Dam
Kolhapur Flood : कोल्हापुरात पूरसदृश परिस्थिती; 59 बंधारे पाण्याखाली, आज-उद्या Yellow Alert

कसबा बावडा येथे पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणी पातळी ३५ फूट ७ इंचावर गेली आहे. आणखी ३ फूट पाणी वाढल्यानंतर पंचगंगा इशारा पातळी गाठणार आहे. मध्यरात्रीपर्यंत पंचगंगा इशारा पातळी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Kalammawadi Dam Radhanagari Dam
Koyna Dam Update : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या 'कोयना'च्या पाणी पातळीत वाढ; धरणात 'इतक्या' TMC साठ्याची नोंद

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या धुवॉंधार पावसाने दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. राधानगरी धरणातील ८.३६ टीएमसीपैकी ५.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर, काळम्मावाडी धरणात (Kalammawadi Dam) ८.९५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

सकाळपर्यंत ९ टीएमसी पाणीसाठा होऊ शकतो. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने पेरण्यांना गती दिली आहे. ज्या पेरण्या यापूर्वी झाल्या आहेत, त्यांची कोळपणी सुरू झाली आहे. माळरानातील पिकांना मोठा दिलासा मिळून तरतरी आलेली दिसून येत आहे.

Kalammawadi Dam Radhanagari Dam
Tourism News : पर्यटनासाठी जाताय? मग, 'ही' काळजी घ्यायलाच हवी, अन्यथा जीव गमावून बसाल!

धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) पाण्याचा विसर्ग

  • राधानगरी ८.३६ ५.९५ १३५०

  • तुळशी ३.४७ १.२८ नाही

  • वारणा ३४.३९ २१.२५ ९२२

  • दूधगंगा २५.३९ ८.९५ नाही

  • कासारी २.७७ १.८५ २५०

  • कडवी २.५१ १.६७ नाही

  • कुंभी २.७१ १.८५ नाही

  • पाटगाव ३.७१ २.१४ नाही

  • चिकोत्रा १.५२ ०.६० नाही

  • चित्री १.८८ ०.८१ नाही

  • जंगमहट्टी १.२२ ०.५४ नाही

  • घटप्रभा १.५६ १.५६ ५१६७

  • जांबरे ०.८१ ०.८२ १४६७

  • आंबेओहोळ १.२४ ०.५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Andra Dam News Andar Maval Villagers Oppose 100 MLD Water Pipeline to Pimpri Chinchwad Over Pending Compensation Demands
Nanibai Chikhali Dam Latest News,
2628 Cusecs Water Discharge From Radhanagari Dam
Gokul election 2026 Arun Dongale
Marathi News Esakal
www.esakal.com