Tourism News : पर्यटनासाठी जाताय? मग, 'ही' काळजी घ्यायलाच हवी, अन्यथा जीव गमावून बसाल!

पाऊस सुरू झाल्यानंतर लोक वर्षा पर्यटनाला बाहेर पडत आहेत.
Tourism AmbaGhat Radhanagari Chandoli Dudhsagar Waterfalls
Tourism AmbaGhat Radhanagari Chandoli Dudhsagar Waterfallsesakal
Summary

जिल्ह्यातील अनेक लोक आंबा घाट, राधानगरी, चांदोली, बर्की, दूधसागर धबधबा, गणपतीपुळे येथे जात आहेत.

सांगली : जिल्ह्यात पाऊस नाही, मात्र राज्यभर तो कोसळतो आहे. धबधबे (Waterfalls) कोसळू लागले आहेत. पर्यटनासाठी (Tourism) पावले वळू लागली आहे. पर्यटन आनंदच देते, मात्र उत्साहाला थोडा आवर घाला. काळजी घ्या आणि जीवाशी खेळू नका. जल्लोष एका बाजूला आणि जीव एका बाजूला...जी है तो जहॉं है, हे आधी लक्षात ठेवा.

Tourism AmbaGhat Radhanagari Chandoli Dudhsagar Waterfalls
Koyna Dam Update : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या 'कोयना'च्या पाणी पातळीत वाढ; धरणात 'इतक्या' TMC साठ्याची नोंद

पाऊस सुरू झाल्यानंतर लोक वर्षा पर्यटनाला बाहेर पडत आहेत. धबधब्याच्या ठिकाणी गर्दी होतेय. समुद्रावरही लोक जात आहेत. अशावेळी उत्साहाला आवर घातला पाहिजे. अनेक अपघात होत आहेत. लोकांचा बळी जात आहे. सेल्फीचा मोह टाळावा, असेही आवाहन पोलिस करत आहेत.

Tourism AmbaGhat Radhanagari Chandoli Dudhsagar Waterfalls
Transport Board : आता स्वस्तात मस्त पाहा धबधबे; परिवहन मंडळानं जारी केली पॅकेज टूर, 'हे' धबधबे पाहता येणार

समाज माध्यमातून वर्षा पर्यटनवेळी झालेल्या अपघातांचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. छोट्या-छोट्या चुका जीवावर उठत आहेत. त्याबाबत सावधगिरी बाळगणे, अति उत्साह न दाखवणे, व्हिडिओ आणि सेल्फीसाठी धोका न पत्करणे याबाबत दक्षता घेतली पाहिजे. थेट धबधब्याखाली उभे राहणे टाळले पाहिजे. कारण, धबधब्यातून आलेला एखादा दगड जीवघेणा ठरू शकतो, असे अनेक ठिकाणी घडले आहे.

जिल्ह्यातील अनेक लोक आंबा घाट, राधानगरी, चांदोली, बर्की, दूधसागर धबधबा, गणपतीपुळे येथे जात आहेत. कोकणातला पाऊस अनुभवण्याचा आनंद घेत आहेत. हे करताना चारचाकी वाहनदेखील काळजीपूर्वक चालवावे, धो पाऊस पडत असताना वाहन चालवू नये, पाऊस कमी झाल्यानंतर पुढे जावे, धुक्यातून कसा मार्ग काढायचा याचा सराव असणारा चालकच सोबत न्यावा, असे आवाहन पोलिसांनीही केले आहे.

Tourism AmbaGhat Radhanagari Chandoli Dudhsagar Waterfalls
मोठी बातमी! 50 वर्षांपासून धगधगत असलेला बेळगाव सीमाप्रश्‍न सुटणार? 'ग्रामविकास'नं मागवली सीमेलगतच्या गावांची माहिती

काय काळजी घ्याल

  • सेल्फीसाठी धोकादायक स्पॉटवर जाऊ नका

  • रस्ते निसरडे आहेत, काळजीपूर्वक चाला

  • ग्रुपमध्ये दंगामुस्ती करताना सहजही ढकलू नका

  • मद्यपी पर्यटकांपासून सावध राहा

  • स्वतः मद्यपान करून पर्यटनाला जाऊ नका

  • धबधब्याच्या पाण्याखाली थेट जाणे टाळा, दगड डोक्यात पडू शकतो

  • पाणी किती खोल आहे, याचा अंदाज नसताना धाडस करू नका

  • उत्तम अवस्थेत असलेले वाहन व जाणकार चालक असेल तेच वाहन न्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com