esakal | Kolhapur Rain - राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Rain - राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले

परिणामी धरण उच्चतम पातळीला भरले असून याचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले.

Kolhapur Rain - राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले

sakal_logo
By
- राजू पाटील

राधानगरी : गेल्या दोन दिवसाच्या संततधार पावसामुळे राधानगरी (Radhanagari Dam) धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाच्या स्वयंचलित सात दरवाजांपैकी दोन दरवाजे आज दुपारी खुले झाले. (Kolhapur Rain Update) यातून व पायथ्याच्या वीज गृहातून असे 4256 क्यूसेक पाणी भोगावती नदी पत्रात सोडले जात असल्याने नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. (Kolhapur Rain)

हेही वाचा: शिक्कामोर्तब! महिलांसाठी NDAतून सैन्यात अधिकारी होण्याचा मार्ग खुला

कालपासून राधानगरी धरण क्षेत्रात पावसाने जोर धरला आहे. यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी धरण उच्चतम पातळीला भरले असून याचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले. यातून प्रत्येकी 1428 व वीज गृहातून 1400 क्युसेक्स असे 4256 क्यूसेक पाणी प्रवाहित झाले आहे. धरण क्षेत्रावर 61 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. स्वयंचलित दरवाजे दरवाजे खुले होण्याची ही यंदाची सहावी वेळ आहे. दरम्यान काळम्मावाडी धरण 95 टक्के भरले असून 24.14 टीएमसी पाणी संचय झाला आहे. हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ सव्वा टीएमसी पाण्याची गरज आहे.

हेही वाचा: 'टिंगू-मिंगू बडेजाव मारायला लागले', विनायक राऊतांनी राणे पुत्रांना डिवचले

जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली

दरम्यान कालापासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप तर काही ठिकाणी जोरदार स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. आज 8 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 पर्यंत 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सध्या कसबा बावडा येथे राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 18 फूट 10 इंच इतकी आहे.

loading image
go to top