
कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार असले, तरी लोकशाहीपूर्वी राजर्षी शाहूंनी करवीर संस्थानात संविधानाची बीजं रोवली होती. येत्या काळातही देशाचे संविधान सांभाळण्यासाठी राजर्षी शाहूंचा समतेचा विचार गरजेचा असल्याचे स्पष्ट मत दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे व्यक्त केले.