कोल्हापूर : ऋतुराज पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वाढदिवसानिमित्त केले विविध उपक्रमांचे आयोजन
ऋतुराज पाटील
ऋतुराज पाटीलsakal

कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त व आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या ‘यशवंत निवास’ येथे व सायंकाळी अजिंक्यतारा कार्यालयात मान्यवरांसह नागरिकांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती.

आमदार पाटील यांच्या निवासस्थानी सकाळी कुटुंबीयांनी औक्षण करून निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. सौ. शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, मेघराज काकडे, पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील, मुलगा अर्जुन आणि आर्यमन आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडूंसह स्केटिंगपटूंनीदेखील शुभेच्छा दिल्या. आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, विश्वेश निपुण कोरे, गोकुळ संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अंजना रेडेकर, मधुरिमाराजे छत्रपती, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षक नेते दादासाहेब लाड, बाबा पाटील, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलातील कर्मचाऱ्यांनी आमदार पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री अमित देशमुख, मंत्री यशोमती ठाकूर, सत्यजित तांबे, मंत्री नितीन राऊत, मंत्री प्राजक्त तनपुरे, मंत्री वर्षा गायकवाड, मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार धीरज देशमुख, प्रकाश आबिटकर, नरहरी झिरवळ, अतुल बेनके, रोहित पवार, रोहित पाटील, अरुण लाड, अनिकेत जाधव, कुणाल पाटील, संजय बनसोडे, इम्रान प्रतापगडी, सचिन सावंत, दत्तात्रय भरणे आदींनी शुभेच्छा दिल्या.

सेवा रुग्णालयात फळे वाटप

सेवा रुग्णालयात फळे वाटप केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम, प्राचार्य डॉ. जाविद एच. सागर आणि शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. रक्तदान, थॅलेसेमिया चाचणी शिबिर झाले. डी. वाय. पाटील ग्रुपच्या श्रीलेखा साटम, डी. वाय पाटील ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत पालेकर यांच्या हस्ते शिबिराला प्रारंभ झाला. ५५ जणांनी रक्तदान केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com